सगुणा आणि बाबूराव हे एक गरीब दांपत्य. शशिकांत हा त्यांचा एकूलता एक मुलगा. दोघेही त्याला लाडाने शशी म्हणत. दिवसभर काबाडकष्ट, मोलमजूरी करुन त्यांनी शशीला वाढवलं होतं. शशी आता इयत्ता ५ वीत शिकत होता. परंतु शशीचा स्वभाव आईवडीलांच्या एकूणच विरोधात होता. आई वडीलांच्या कष्टाची त्याला तेवढी जाण नव्हती. आपला मुलगा शिकून मोठा व्हावा असे त्याच्या आईबाबाला सतत वाटायचे. पण शशीचे काही अभ्यासात, शाळेत लक्ष नसायचे.
मजूरी करुन मिळालेल्या पैशांतून सगुणा त्याला रोज प्रेमाने भाकरतुकडा खाऊ घालायची...पण शशीला अन्नाचेही तेवढे महत्त्व नव्हते. बऱ्याच वेळा अर्धे अन्न तसेच सोडून ऊठायचा. कधीकधी बाबूराव त्याच्याकरिता फळं आणायचा तेव्हा खाण्याचे नाटक करुन तो ती गुपचूप फेकून द्यायचा. त्याला कुठल्याच गोष्टीचे फारसे महत्त्व वाटत नव्हते. तो घरीही कुठल्याच कामाला हात लावत नव्हता. त्याच्या या अशा बेफिकीरी वागण्याने मुलगा वाया जातो की काय अशी चिंता त्याच्या आईबाबाला सतावत होती.
एके दिवशी अचानक सगुणा आणि बाबूराव आजारी पडले. त्यांच्या भागात डेंग्यूचा आजार फैलावला होता. गावात बरेचजण तापाने फणफणले. गावातल्या काही चांगल्या लोकांनी सगुणा व बाबूरावला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परिस्थिती गरीबीची असल्याने इतर मोठ्या हॉस्पीटलला नेणे अशक्य होते. आणि त्यांना त्याबाबतीत मदत करणारे कुणी जवळचे नातेवाईकही नव्हते.
आता मात्र सर्व जबाबदारी शशीवर येऊन पडली. आई वडील काबाडकष्ट करायचे तेव्हा त्याला तितकेसे महत्त्व वाटायचे नाही पण आता त्याचे डोळे खाडकन उघडले होते. कारण आई वडीलांना दवाखान्यात जेवण घेऊन जायला घरात तर अन्नाचा कणही नव्हता. पैसेही नव्हते.काहीच नव्हतं. त्याला स्वत:लाही उपासमार सहन करावी लागली.
आता मात्र शशिला मागचे दिवस आठवले. तेव्हा तो अन्न सर्रास फेकून द्यायचा हे आठवल्यावर त्याला रडू आले. तेव्हा जर अन्न वाचवलं असतं, जपलं असतं तर आज घरी काही ना काही असतं...निदान आईबाबासाठी भाताची पेज करुन नेली असती असं त्याला वाटलं... आई बाबा कष्ट, मोलमजूरीला जायचे तेव्हा त्यांना घराकडे पहायला वेळ कमी मिळायचा...तेव्हा घराची आवराआवर, परिसराची स्वच्छता करायला थोडा हातभार लावला असता तर डासांचा फैलाव होऊन आई बाबाला डेंग्यू नसता झाला...असे विचार त्याच्या मनात घोळू लागले. त्याला पश्चात्ताप झाला. अन्नाचा रोज कण जरी वाया गेला तर त्यामागची खुप मोठी मेहनत वाया गेल्यासारखेच आहे. आई वडील मी मोठा होऊन कुणी चांगला बनेन अशी स्वप्नं पाहतायत, त्यासाठीच एवढे कष्ट करतायत आणि मी मात्र शाळेकडे दुर्लक्ष करुन त्यांचं स्वप्न धुळीला मिळवत आहे...हे सर्व आठवून तो हुंदके देऊन रडू लागला.
तेवढ्यात शेजारीच राहणाऱ्या काकू त्याच्याजवळ आल्या. त्यांनी शशीच्या पाठीवर हात ठेवला. डोक्यावरुन प्रेमाने हात फिरवला.
"काळजी करु नकोस शशी. मी आहे ना. हा बघ डबा बनवलाय तुझ्या आई बाबासाठी. चल आपण दवाखान्यात जाऊ."
काकूंनी शेजारधर्म पाळला. पण मी मुलगा असून आईबाबांच्या मनासारखं वागत नाही....शशीने क्षणात डोळे पुसले...
"काकू, मी आजपासून आईबाबाचं ऐकीन. चांगला वागेन..." शशी काकूला म्हणाला...
दोघेही दवाखान्यात गेले. शशीबद्दल काकूंनी सगूणा बाबूरावला सांगताच दोघांनाही खुप आनंद झाला. त्या आनंदाच्या भारात त्यांची प्रकृती लवकर सुधारु लागली...
लवकरच ते बरे होऊन घरी आले...आता त्यांच्या घरी अजिबात अन्न वाया जात नाही. प्रत्येक गोष्टीचे महत्त्व राखले जाते. शशी रोज शाळेत जाऊन चांगला अभ्यास करतोय. एका आईबाबासाठी यापेक्षा आनंदाची गोष्ट कोणती असणार ना....
------------------------------------------------------
-लेखन:प्रविणसर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा